१.
"स्वत:पेक्षा जरा कमी असलेल्या माणसाशीच दुसरा मैत्री करतो. पैशाने,
बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठे कमी आहे हे हेरल्यावरच त्या
प्रांतापुरती मैत्री होते."
२. "गांधारी ..... महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. अर्जुन, कर्ण, भीष्म, कृष्ण, ह्यासारख्या महाभारतातील
प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला.
विद्वत्ता, शोर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली
नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य
कसं केलं माहित आहे? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलचं आहे, हे
ओळखल्यामुळे. तो क्षण आपला. म्हणू तेव्हा उगवू शकतो, ह्या आधारावर."
३. एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर श्रावणी."
लेखक: व. पु. काळे
पुस्तक: कर्मचारी