Thursday, December 13, 2012

भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी



१. "शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे
     तो रतीला चुम्बिताही सांगेल कि आता पुरे...
     तोंडही भगवन तयाचे मला दावू नका
     न जरी मंजूर हेही माझे तया दावू नका........"

२. "पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी
      जळल्यावारी सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही
     आमुचे वार्धक्य जैसे आम्ही कधी ना पहिले
     मिटलेच होते नेत्र नाही मृत्युसही मी पहिले..."

३. "तुमचाच आहे अंश भगवन मीही कुणी दुसरा नव्हे
      लोळण्या पायी तुझ्या तुमचा कुत्रा नव्हे..."

४." दोस्तहो दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
      येऊनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
      हाय हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी
      सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी...."













- भाऊसाहेब पाटणकर.









No comments:

Post a Comment

Video