Thursday, December 13, 2012

भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी



१. "शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे
     तो रतीला चुम्बिताही सांगेल कि आता पुरे...
     तोंडही भगवन तयाचे मला दावू नका
     न जरी मंजूर हेही माझे तया दावू नका........"

२. "पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी
      जळल्यावारी सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही
     आमुचे वार्धक्य जैसे आम्ही कधी ना पहिले
     मिटलेच होते नेत्र नाही मृत्युसही मी पहिले..."

३. "तुमचाच आहे अंश भगवन मीही कुणी दुसरा नव्हे
      लोळण्या पायी तुझ्या तुमचा कुत्रा नव्हे..."

४." दोस्तहो दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
      येऊनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
      हाय हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी
      सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी...."













- भाऊसाहेब पाटणकर.









Friday, December 7, 2012

विद्युतप्रकाश

१. जग मनुष्यांच्या खेळाकरिता निर्माण झालेले नाही, देवाच्या खेळाकरिता ते आहे. माणसे म्हणजे काय? नुसती खेळणि.



२. जुगाराला लोक वाईट म्हणतात; पण खरोखर सगळे जग जुगारी आहे. डॉक्टर रोग्याला वाचविण्याची, वकील आरोपीला फासावरुन सोडविण्याची किंवा मास्तर मुलाला वरच्या इयत्तेत घालण्याची हमी थोडीच देतात! पण लोक त्यांना पैसे देतातच की नाही? शिवाय सगळे जग नशिबावर चालले आहे बघा. जुगार म्हणजे नशीब! आणखी काय आहे दुसरे? जन्म हा जुगार, परीक्षा हा जुगार, लग्न हा जुगार, आणि मरण हाही जुगाराच.



लेखक: वि. स. खांडेकर
पुस्तक: विद्युतप्रकाश 














Monday, November 26, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ४


२५. स्मिता पाटील


 २६. रेणुका शहाणे


२७. शोभना समर्थ


२८. राखी सावंत


२९. सीमा देव


३०. शशिकला


३१. शिल्पा शिरोडकर


३२. शुभा खोटे











Friday, November 16, 2012

मायाबाजार

१. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.


२. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझ झटकता येते. कारण पदवीपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना शब्द जेव्हा झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो.


लेखक: व. पु. काळे 
पुस्तक: मायाबाजार

Thursday, October 25, 2012

कर्मचारी

 
१. "स्वत:पेक्षा जरा कमी असलेल्या माणसाशीच दुसरा मैत्री करतो. पैशाने, बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठे कमी आहे हे हेरल्यावरच त्या प्रांतापुरती मैत्री होते."
 
२. "गांधारी ..... महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. अर्जुन, कर्ण, भीष्म, कृष्ण, ह्यासारख्या महाभारतातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला. विद्वत्ता, शोर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य कसं केलं माहित आहे? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलचं आहे, हे ओळखल्यामुळे. तो क्षण आपला. म्हणू तेव्हा उगवू शकतो, ह्या आधारावर."
 
३. एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर श्रावणी."
 
 
लेखक: व. पु. काळे
पुस्तक: कर्मचारी
 
 
 
 
 
 
 
 

Sunday, October 7, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ३

१७. नंदा


१८. नूतन


१९. पद्मिनी कोल्हापूरी


२०. पल्लवी जोशी


२१. राजश्री


२२. मुग्धा गोडसे


२३. नलिनी जयवंत


२४. नम्रता शिरोडकर











Friday, September 14, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... २

९. मधू  सप्रे


१०. ममता कुलकर्णी


११. किमी काटकर


१२. किशोरी शहाणे


१३. माधुरी दिक्षित


१४. ईशा कोप्पीकर


१५. लीला चिटणीस


१६. लीना चंदावरकर
















Video