Friday, January 11, 2013

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ६


४१. रीमा लागू.


४२. अमृता पत्की.


४३. स्मिता जयकर.


४४. कार्तिका राणे.


 ४५. सयाली भगत


४६. विद्या मालवदे.


४७. मृण्मयी लागू.










Saturday, January 5, 2013

अमृतवेल

१. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
 
 
 
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत  नाही.







लेखक: वि. स. खांडेकर.
पुस्तक: अमृतवेल

Friday, December 28, 2012

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मराठी मुली ... ५


३३. सोनाली बेंद्रे.


३४. सोनाली कुलकर्णी.


३५. तारा देशपांडे.


३६. तेजस्विनी कोल्हापुरे.


३७. उर्मिला मातोंडकर.


३८. वर्षा उसगावकर.


३९. तनुजा.


४०. अंतरा माळी.










Tuesday, December 25, 2012

संपूर्ण बाळकराम

१. आम्हा पौर्वात्यांच्या आणि पाश्चात्य इंग्रजांच्या आचार विचार कल्पनांत जे दक्षिनोत्तर अंतर आहे ते लक्षात येते. इकडे आम्ही 'गरजवंताला अक्कल नाही' असे म्हणतो, तर तिकडे इंग्रज लोक 'गरज हि शोधाकतेची आई आहे!' आस्व त्याबरहुकूम गरजेचा मारा चुकवितात आणि उलट 'अक्क्ल्वान्ताला गरज नसते' असा व्यत्यास सिद्ध करून दाखवितात.
 
2. His Verticality Went into His Horizontility” साधा अर्थ तो पडला.
 
 
लेखक: रा. ग. गडकरी.
पुस्तक: संपूर्ण बाळकराम.
 
 
 
 
 

Wednesday, December 19, 2012

ययाति

१. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.
 
२. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.
 
३. या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे.. मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.
 
४. दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा.
 
५. कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.
 
६. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
 
७. इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा! नाही तर तो असून नसून सारखाच! म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.
 
८. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे. 
 
 
 
 
लेखक: वि. स. खांडेकर
पुस्तक: ययाति












Thursday, December 13, 2012

भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी



१. "शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे
     तो रतीला चुम्बिताही सांगेल कि आता पुरे...
     तोंडही भगवन तयाचे मला दावू नका
     न जरी मंजूर हेही माझे तया दावू नका........"

२. "पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी
      जळल्यावारी सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही
     आमुचे वार्धक्य जैसे आम्ही कधी ना पहिले
     मिटलेच होते नेत्र नाही मृत्युसही मी पहिले..."

३. "तुमचाच आहे अंश भगवन मीही कुणी दुसरा नव्हे
      लोळण्या पायी तुझ्या तुमचा कुत्रा नव्हे..."

४." दोस्तहो दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
      येऊनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
      हाय हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी
      सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी...."













- भाऊसाहेब पाटणकर.









Friday, December 7, 2012

विद्युतप्रकाश

१. जग मनुष्यांच्या खेळाकरिता निर्माण झालेले नाही, देवाच्या खेळाकरिता ते आहे. माणसे म्हणजे काय? नुसती खेळणि.



२. जुगाराला लोक वाईट म्हणतात; पण खरोखर सगळे जग जुगारी आहे. डॉक्टर रोग्याला वाचविण्याची, वकील आरोपीला फासावरुन सोडविण्याची किंवा मास्तर मुलाला वरच्या इयत्तेत घालण्याची हमी थोडीच देतात! पण लोक त्यांना पैसे देतातच की नाही? शिवाय सगळे जग नशिबावर चालले आहे बघा. जुगार म्हणजे नशीब! आणखी काय आहे दुसरे? जन्म हा जुगार, परीक्षा हा जुगार, लग्न हा जुगार, आणि मरण हाही जुगाराच.



लेखक: वि. स. खांडेकर
पुस्तक: विद्युतप्रकाश 














Video